राजारामबापू साखर कारखान्यात अक्षता कलशाचे स्वागत

सांगली : राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावरील राम मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत करून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

सोमवारी सकाळी इस्लामपूर येथील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास समितीचे राम सेवक डॉ. प्रमोद कणप, अजित जाधव, अथर्व भागवत, तुषार भूतकर व कार्यकर्ते अक्षता कलश घेऊन राम मंदिरात आले. यावेळी आ. जयंत पाटील यांच्या हस्ते अक्षता कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, दिलीप वग्याणी, विराज शिंदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here