शाब्बास… शेतकऱ्याने एका एकरात पिकवला १३८ टन ऊस

पुणे : महागाईची झळ शेती उद्योगाला बसत असून ऊस शेती कारणे दिवसेंदिवस जिकीरीचे होत आहे. मात्र अशा संकटावरही काही शेतकऱ्यांनी मात करत शेती कशी करावी, याचा आदर्श प्रस्थापित केला आहे. पुणे जिल्ह्यातील पणदरे भागातील सोनकसवाडी येथील शेतकरी संजय जगताप यांनी उसाचे उच्चांकी, एकरी १३८ टन उत्पादन घेतले आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीदेखील ॲड. जगताप यांच्या या प्रयोगाची दखल घेतली आहे.

जगताप पुण्यात वकिली करतात. व्यवसायासोबत त्यांनी शेतीदेखील सुरूच ठेवला आहे. ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. त्यांनी उसाच्या आधी केळीची बाग लावली होती. उत्पादन घेतल्यानंतर तेथे उसाची लागवड केली. को ८२०३२ या वाणाने त्यांना हे भरघोस उत्पादन दिले आहे. जगताप यांनी आडसाली हंगामात ४२०० गन्ना मास्टर रोपांची लागवड केली. रोपांमध्ये दीड फुटाचे अंतर ठेवले. पिकाची बांधणी, तगारणी झाल्यावर योग्य प्रमाणात रासायनिक खते आणि औषधे देण्यात आली. ठिबक सिंचन प्रणालीने पाणी व्यवस्थापन केले. त्यामुळे उसाची चांगली जोमदार वाढ झाली. उसाचे त्यांनी एकरी १३८ टन उत्पादन घेतले. त्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here