एप्रिल-सप्टेंबर कालावधीत गव्हाची निर्यात दुप्पट होवून पोहोचली १.४८ अब्ज डॉलरवर

नवी दिल्ली : वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, एप्रिल -सप्टेंबर २०२२-२३ यादरम्यान देशात गव्हाचे निर्यात दुप्पटीहून अधिक १.४८ बिलियन अमेरिकन डॉलर झाले आहे. एक वर्षापूर्वीच्या समान कालावधीत ही निर्यात ६३० मिलियन अमेरिकन डॉलर होती. मात्र, सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले होते. तरी काही शिपमेंटमध्ये अशा देशांना खाद्य सुरक्षेअंतर्गत जे देश विनंती करतील, त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक गहू पुरवठा विस्कळीत झाला आहे. मंत्रालयाने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या सहा महिन्याच्या कालावधीत कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ उत्पादनांचे निर्यात २५ टक्क्याने वाढले आहे. कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न निर्यात विकास प्राधिकरणातर्फे उत्पादनांची एकूण निर्यात एप्रिल-सप्टेंबर २०२२ मध्ये वाढून १३.७७ बिलियन अमेरिकन डॉलर झाले आहे. एक वर्षापूर्वीच्या समान कालावधीत ही निर्यात ११.०५ बिलियन अमेरिकन डॉलर झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here