नवी दिल्ली : मध्य प्रदेशात गव्हाचा संथ सुरू असलेला पुरवठा आणि खरेदीमुळे सरकार आपल्या गहू खरेदीच्या उद्दिष्टात सुधारणा करून २८० लाख टन करू शकेल. आपल्या आधीच्या ३४१ लाख टनाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे खूप कमी आहे. मध्य प्रदेशात स्थानिक व्यापाऱ्यांनी मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीच्या अनेक स्लबमुळे भारतीय अन्न महामंडळाने (FCI) खरेदी केंद्रावर आपला गहू विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांना निराश केले आहे. त्यामुळे या खरेदी केंद्रांवर गव्हाची उपलब्धता कमी झाली आहे आणि निकटच्या भविष्यात समग्र खरेदी प्रभावीत होवू शकते. दरम्यान, गेल्या सप्ताहातील खरेदीच्या तुलनेत आतापर्यंत एकूण खरेदी १९५ लाख टनापेक्षा अधिक झाली आहे.
आतापर्यंत गव्हाची खरेदी पंजाबचे मुख्य योगदान आहे. त्यापाठोपाठ हरियाणा आणि मध्य प्रदेशाचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी FCI ने आपल्या खरेदी उद्दिष्टाच्या ६० टक्के कमी खरेदी केली आहे आणि त्यामुळे यावर्षी खरेदी देशाच्या अन्न सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बनली आहे. एफसीआयच्या अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गव्हाच्या आवकेवर दबाव असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आणि याबाबत तत्काळ निर्णय घेण्यासाठी मंत्रीगटाला पाठविण्यात आले आहे.
हवामानाशी संबंधीत कारणांमुळे शेतकऱ्यांना आपले नुकसानग्रस्त पिक विक्री करण्यास वाचविण्यासाठी केंद्र सरकारने पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आपल्या खरेदीच्या गुणवत्ता मानकांमध्ये सूट दिली होती. मात्र, या निकषांमधील अनेक स्लॅबमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला आणि गहू एफसीआयला विक्री करण्याऐवजी बाजारात पाठवला.
एफसीआयच्या अधिकाऱ्यांनी संभ्रम दूर करणे आणि खरेदी सुरळीत करण्यासाठी स्लॅब समायोजनाचे आवाहन केले आहे. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांनाही खरेदी केंद्रावर पैशांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पैसे मिळण्यास एक आठवड्याचा वेळ लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गव्हाची विक्री करण्याबाबत अनिच्छा आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, खासगी क्षेत्रातील मोठे खरेदीदार आक्रमक रुपात मध्य प्रदेशातून गहू खरेदी करतात. त्यामुळे स्थानिक बाजारात घाऊक गव्हाच्या किमतीत वाढ होत आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, शेतकरी मुगाच्या पेरणीत व्यस्त आहेत आणि अक्षय तृतीया, ईदसारख्या सणांनी गव्हाच्या खरेदीला संथ केले आहे. अनेक स्लॅबमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आपले उत्पादन बाजारात विक्री करण्याची फूस दिली आहे. ते म्हणाले की, संभ्रम दूर करण्यासाठी आणि एक स्लॅब बनविण्यासाठी मंत्री समुहाला माहिती देण्यात आली आहे.