नवी दिल्ली : देशभरातील राज्यांच्या हवामानाबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाने अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार, दक्षिणेकडील राज्यांत हलका ते मोठा पाऊस कोसळू शकतो. तर उत्तर भारतातील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा तडाखा लोकांना सोसावा लागू शकतो. उत्तर भारतात बहुसंख्य राज्यांतील तापमान ४० डिग्री पेक्षा अधिक असेल. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, मोका चक्रीवादळामुळे हे परिणाम पाहायला मिळत आहेत.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आज, १२ मे रोजी अंदमान निकोबारच्या साही भागात जोरदार वारे वाहतील. केरळ, ओडिशा, कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. तर बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, पश्चिमी राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा तडाखा सोसावा लागेल. १३ मे रोजी मणिपुर, मिजोरम, अंदमान-निकोबार, नागालँड आणि त्रिपुरात पाऊस कोसळेल. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल. पश्चिमी राजस्थान, उप हिमालयीन पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश किनारपट्टीत उष्णतेची लाट असेल. १४ मे रोजी नागालँड, मणिपुर, त्रिपुरा, मिझोराम, अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश आणि आसाम मध्ये जोरदार पाऊस कोसळेल. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.