नवी दिल्ली : खाद्यपदार्थ आणि कच्च्या पेट्रोलियमच्या किमती कमी झाल्यामुळे डिसेंबरमध्ये घाऊक महागाई निर्देशांक खालावला आहे. घाऊक महागाईचा दर नोव्हेंबरमधील ५.८५ टक्क्यांवरून डिसेंबर २०२२ मध्ये ४.९५ टक्क्यांवर आला. उपलब्ध सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई कमी होऊ लागली आहे. ही घसरण प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमती आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे झाली आहे.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, याबाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की डिसेंबर २०२२ मध्ये अन्न वस्तूंची महागाई दरातील घट १.२५ टक्के आणि इंधन आणि उर्जा महागाई १८.०९ टक्के होती. समीक्षाधीन महिन्यात उत्पादित उत्पादनांची चलनवाढ ३.३७ टक्के होती. सरकारच्या अधिकृत सूत्रांनी माहितीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये महागाई दरातील घसरण मुख्यत्वे अन्नपदार्थ, खनिज तेल, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, अन्न उत्पादने, कापड तसेच रसायने आणि रासायनिक उत्पादनांच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे झाली.