महाराष्ट्रातील साखर कामगारांना न्याय मिळवून देणार : कामगार नेते युवराज रणवरे

पुणे : राज्यातील साखर कामगारांच्या अडचणी सोडवून जास्तीत जास्त वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही कामगार नेते युवराज रणवरे यांनी दिली. भवानीनगर (ता. इंदापूर) येथील कामगार नेते व शुगर वर्कर्स युनियनचे अध्यक्ष युवराज रणवरे यांची नुकतीच राज्यातील साखर कामगारांना नवीन वेतनवाढ व अन्य मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीबद्दल रणवरे यांची श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सत्कार केला.

सत्काराला उत्तर देताना युवराज रणवरे यांनी सांगितले की, राज्यातील साखर कारखान्यातील कामगार हे कारखान्याचा कणा आहेत. कामगारांच्या चुलीचा व कारखान्याच्या चिमणीचा धूर एकच असतो. कामगारांना जास्तीतजास्त वेतन मिळवून देवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, अभिजित रणवरे, दीपक निबांळकर, राजेंद्र गावडे, अॅड. लक्ष्मणराव शिंगाडे, रसिक सरक, दत्तात्रय सपकळ, सर्जेराव जामदार, बाळासाहेब सपकळ, नारायण कोळेकर, संतोष ढवाण, कार्यकारी संचालक अशोक जाधव, हनुमंत करवर, अजित थोरात, सतीश गावडे, दत्तात्रेय निंबाळकर स्वप्नील गावडे, सुहास निंबाळकर, भाऊसाहेब पवार, संजय मुळीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here