आग्रा : ज्या पद्धतीने दुग्ध, कृषी मंत्री असताना राज्याला देशात पहिल्या क्रमांकावर आणले, तशाच पद्धतीने ऊस उत्पादनात राज्य अग्रेसर बनेल असे प्रतिपादन ऊस विकास तथा साखर उद्योग मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांनी केले. ऊस मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपल्या मतदारसंघात पोहोचल्यानंतर कोटवन सीमेवर त्यांचे जोरदार सवागत करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांशी सतत संवाद साधला जाईल. शेतकऱ्यांना आदंलोन करण्याची वेळच येऊ नये याची दक्षता घेऊ असे यावेळी मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लक्ष्मीनारायण म्हणाले, कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. यासाठी सर्व अधिकाऱ्यांना बोलावले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी हे खाते देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. दरम्यान, ऊस मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण हे दिल्लीहून मथूरापर्यंत आल्यानंतर हरियाणातही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पलवल, होडल, फरीदाबाद, बल्लभगडमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी मंत्र्यांचे स्वागत केले. कोटवन सीमेवर भगवान सिंह भूरा प्रधान, नरदेव चौधरी, कर्मवीर चौधरी, मनोज फौजदार, राजवीर सिंह, हरिओम गुप्ता, श्याम प्रधान, प्रीतम प्रधान, दान बिहारी, दिनेश बठैनिया आदी उपस्थित होते.