कोल्हापूर, ता. 18: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होईपर्यंत कारखाने बंद ठेवा. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल दिला, यावर्षीच्या गळीत हंगाम सुरू करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात, साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये ऊस दरासाठी बैठक़ झाली. बैठक़ीत योग्य निर्णय झाला नसल्याने जयसिंगपूर येथे शनिवारी (ता. 23) होणाऱ्या ऊस परिषदेनंतर कारखानदार आणि संघटनेसोबत सोमवारी (ता. 25) पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, पूरस्थितीमुळे उसाचे नूकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात कोणत्याही परिस्थितीत एक रकमी एफआरपी तर मिळालीच पाहिजे, पण एफआरपी पेक्षा जास्ती-जास्त दर घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही. असा इशारा प्रा. पाटील यांनी दिला. यावेळी, कारखानदारांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, गणपतराव पाटील, राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. जी. मेढे उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.