सहारनपूर : विभागातील सर्व साखर कारखान्यांनी होळीपूर्वी शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करावीत अशा सूचना आयुक्त ए. व्ही. राजमौली यांनी केली. मुदतीत पैसे न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना दिले. याबाबत कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा खपवून घेतला जाणार नाही असे ते म्हणाले.
आयुक्त ए. व्ही. राजमौली यांनी ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांना या सक्त सूचना दिल्यानंतर सहारनपूरचे जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणि त्रिपाठी यांनी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसोबत बैठक घेतली. त्यांना तातडीने पैसे अदा करण्यास सांगितले. सरसावा साखर कारखान्यानच्या युनीट प्रमुख आणि अध्यक्षांनी होळीआधी १३ कोटी रुपयांची बिले दिली जातील असे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले. तर गागलहेडी साखर कारखान्याच्या युनीट प्रमुखांनी ३.४ कोटी रुपयांचे बिल सणापूर्वी अदा करण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीत नानौता, शेरमऊ साखर कारखान्याचे युनीट प्रमुख उपस्थित नव्हते असे त्यांनी सांगितले. दोन्ही कारखान्याच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून होळीपूर्वी शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले दिली जात असल्याचे ते म्हणाले.