नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आठ मार्चपासून सुरू झाला आहे. आज या सत्राच्या दुसऱ्या दिवशी, पेट्रोलच्या वाढत्या किंमतीप्रश्नी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे अनेकदा कामकाजात अडथळे आले. अखेरीस गोंधळ थांबत नसल्याने कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.
आजच्या सत्रात पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत का आणत नाही अशी विचारणा करुन विरोधकांनी सरकारची कोंडी केली. यावर राज्यसभेत अनुराग ठाकूर यांनी त्यास उत्तर दिले.
मंत्री ठाकूर म्हणाले, पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत आतापर्यंत कोणतीही शिफारस आलेली नाही.
सदनातील लेखी उत्तरात ठाकूर यांनी म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी जीएसटी परिषदेची शिफारस आवश्यक आहे. आतापर्यंत अशी शिफारस आलेली नाही.