मराठवाड्यातील साखर कारखान्यांवर एफआरपीसाठी आंदोलन करणार : माजी खासदार राजू शेट्टी

जालना : मराठवाड्यातील साखर कारखानदार एकरकमी एफआरपीदेण्यास टाळाटाळ करत आहेत. थकीत एफआरपी व्याजासह वसूल केल्याशिवाय मराठवाड्यातील कारखानदारांना मी सोडणार नाही, मराठवाड्यातील साखर कारखान्यांवर एफआरपीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता.१२) वडीगोद्री येथे दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या वडीगोद्री येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाड्यातील साखर कारखानदार अर्धवट एफआरपीबाबत आघाडीवर आहेत. ही थकीत एफआरपी व्याजासह वसूल केल्याशिवाय मराठवाड्यातील कारखानदारांना मी सोडणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हे सरकारने दिलेले आश्वासन होते. मात्र, अजित पवार आज म्हणतात, की कर्जमाफीसाठी राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही. सलग अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्जित पवारांना निवडणुकीत आश्वासन देताना या स्थितीची जाणीव नव्हती का, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here