कोल्हापूर: एकरकमी ‘एफआरपी ‘साठी सोमवारी (ता. १४) पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर २४ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर असणाच्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना जाब विचारू. यानंतर आर या पारची लढाई करू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आज नांदणी येथील कार्यक्रमात बोलताना दिला. ते म्हणाले, की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्याला राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले होते. त्यामुळे आंदोलन स्थगित केले. असे असताना दोन दिवसांत अनेक साखर कारखान्यांतर्फ एफआरपी ‘पेक्षा ४०० ते ६५०रुपये कमी रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या जात आहेत.अनेक कारखान्यांनी ही रक्कम जमा केली नाही.
ऊसदर नियंत्रण १९६६ नुसार व सुटल्यानंतर १४ विषयांची पार्टी देण्याचे बंधनकारक असतानाही बेकायदेशीर अशाप्रकारे कृती घडत आहेत; तर सरकारने याकडे बघ्याची भूमिका घेतली आहे बेकायदेशीर चालू असलेल्या कारखान्यावर कारवाई होत नाही. त्यांच्या संचालकांवरही कारवाई होत.