EMI वाढवून महागाई घटणार ? हा आहे रेपो रेटचा थेट संबंध!

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा बुधवारी केली. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जूनमधील एमपीसीच्या बैठकीनंतर रेपो दरात वाढ झाल्याची माहिती दिली. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात मे महिन्यात तातडीची बैठक घेऊन प्रदीर्घ कालावधीनंतर रेपो दरात वाढवला होता. गेल्या पाच आठवड्यात रेपो रेट ०.९० टक्के वाढला आहे. याचा थेट परिणाम पर्सनल अथवा होम लोन असलेल्या, ईमआय भरणाऱ्या लोकांवर होणार आहे. रेपो रेट वाढविल्यानंतर बँकांनी कर्जाचे व्याज दर वाढविण्यास सुरुवात केली आहे.

आजकतच्या वृत्तानुसार, आरबीआयने वाढत्या महागाईवर आळा घालण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ करावी लागत असल्याचे स्पष्ट केले आहे. सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी अँड पब्लिक फायनान्सचे अर्थतज्ज्ञ डॉ. सुधाशू कुमार म्हणाले की, जेव्हा कोविड महामारीमुळे बाजारात मागणी कमी आली तेव्हा आरबीआयने व्याज दर घटवून कॅपिटल कॉस्ट कमी केली. तेव्हा अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी ती गरज होती. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता बाजारात गैरवाजवी मागणी आहे. त्यामुळे महागाई वाढत आहे. ती नियंत्रित करण्यासाठी हा पहिला उपाय आहे. दरम्यान, रेपो रेट वाढविल्यानंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महागाईवर चिंता व्यक्त केली होती. लोकांना महागाईपासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले होते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार या आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर ६.७ टक्के राहिल. खाद्यपदार्थांचा वाढत्या किमती महागाई वाढवत आहेत, असे आरबीआयचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here