कोल्हापूर, ता. 24 : साखर विक्रीचा प्रति क्विंटल असणारा 2900 रुपये दर 3100 रुपयांपर्यंत वाढवावा अशी शिफारस केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. वारणा कोडोली येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने झालेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उसाला चांगला दर मिळायचा असेल तर साखरेला दर मिळाला पाहिजे, ही बाब खरी आहे. यासाठी सध्या प्रति क्विंटल साखर विक्री दर 2900 रुपये आहे. हा दर दोनशे रुपयांनी वाढवून 3100 रुपये करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाईल किंवा तशी शिफारस केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली.