हैदराबाद : पुढील निवडणुकीत राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर निजामाबाद जिल्ह्यात इथेनॉल प्लांट स्थापन केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय भारी उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी केले.
राष्ट्रीय स्तरावर, सरकार इथेनॉल योजनांच्या स्थापनेसाठी उद्योजकांना प्रोत्साहित करीत आहे. कारण यातून ऊर्जेचे संकट दूर होण्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. तेल कंपन्या थेट मॅन्युफॅक्चरिंग युनिट कडून इथेनॉलची खरेदी करतील, असे मंत्री पांडे यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री पांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रव्यापी समारंभात भाग घेण्यासाठी सोमवारी निजामाबादचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी इथेनॉल प्लांटबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.