थेउर : यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा यासाठी साखर संचालक, राज्य सरकार व राज्य सहकारी बँकेच्या अधिकार्यांशी चर्चा सुरु आहे. यावर पुढील 25 वर्षांचा विचार करुनच निर्णय घेण्यात येणार आहे. हा कारखाना बंद पडल्यामुळे अनेक उत्पादक आणि कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा कारखाना सुरु करण्यासाठी आम. अशोक पवार यांच्या सहाय्याने प्रयत्न करणार असल्याचे खास. डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
थेउर (ता. हवेली) गावास तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा मिळाला आहे. त्याअनुषंगाने दर्शनासाठी येणार्या भक्तांची राहण्याची उत्तम सोय व्हावी यासाठी गावच्या मालकीचे नवीन भक्तनिवास बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 9 कोटी 31 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ डॉ. कोल्हे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आम. अशोक पवार होते.
यावेळी जि.प. अध्यक्ष विश्वासराव देवकाते, रामभाउ कुंजीर, प्रभाकर काकडे, बापूसाहेब बोधे, हवेली पंचायत समिती उपसभापती युगंधर काळभोर, हिरामण काकडे, राष्ट्रवादीचे दिलीप बाल्हेकर, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त आनंद महाराज तारु, तात्यासाहेब काळे, मंगेश चिवटे, सुदाम गावडे, सरपंच संगीता तारु, विलास कुंजीर, छाया काकडे, आप्पासाहेब काळे, सुरेखा कुंजीर, नंदा कुंजीर आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.