सिंगापूर : कॅसाब्लांका स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीबद्ध असलेल्या कोसुमारला आपली पूर्ण ३०.१ टक्के इक्विटी हिस्सेदारी विक्री करण्यासाठी अनेक मोरक्कोतील गुंतवणुकदारांशी एक करार केला आहे, असे कृषी व्यवसाय उद्योग समुह विल्मर इंटरनॅशनलने असे रविवारी जाहीर केले. जवळपास ५.९६ बिलियन मोरक्कन दिर्हमला (S$८१२.३ मिलियन) हा हिस्सा विक्री केला जाणार आहे. मोरक्कोमध्ये ऊस आणि बिटपासून गाळपासह आयात कच्च्या साखरेवर प्रक्रिया आणि साखरेचे उत्पादनांचे वितरण, व्यवस्थापन हा कोसुमारचा मुख्य व्यवसाय आहे.
विल्मरने सांगितले की, कोसुमारशी देवाण-घेवाण २०२३ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नियामकांच्या अनुमोदनासह काही अटींच्या अधिन राहून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या कराराच्या हिश्याच्या रुपात विल्मर कोसुमारकडून दोन अधिग्रहण करेल. सर्वात आधी ८५.१ मिलियन मोरक्कन दिर्हमच्या एकूण रोखीच्या व्यवहारासाठी मोरक्कोमधील विल्माकोमध्ये कोसुमारचा पूर्ण ४५ टक्के इक्विटी हिस्सा खरेदी केला जाईल. त्यानंतर विल्माको विल्मरची पूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी होईल.