आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलावर सातत्याने दबाव आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा दर समायोजित करताना इंधन कंपन्यांना कसरत करावी लागत आहे. भारत सरकारने देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर विंडफॉल टॅक्स सुधारित करून ६,४०० रुपये प्रती टन केला आहे. हे पाऊल पेट्रोलियम क्षेत्रातील कर कराचा ढाचा सुसंगत बनविण्यासाठी आणि उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा हिस्सा आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारने डिझेलवरील निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील विंडफॉल टॅक्समध्ये सुधारणा करून सरकारला अतिरिक्त महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यातून इंधन कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होईल अशी भीती आहे. कारण, आता त्यांना देशांतर्गत बाजारपेठेत कच्च्या तेलावरील विक्रीला जादा कर द्यावा लागेल.
आज, गुरुवारी २० एप्रिल रोजी पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर असल्याचे दिसून आले आहे. मात्र, देशभरातील शहरांमध्ये इंधनाच्या किमतीत चढ-उतार दिसून आले आहेत. औरंगाबादमध्ये डिझएल व पेट्रोलच्या दरात ०.२७ रुपये प्रती लिटर वाढली आहे. गुवाहाटीत डिझेलच्या दरात १,२९ रुपयांची वाढ दिसून आली तर पेट्रोल ८० पैशांनी वाढले. त्रिवेंद्रम, ठाणे, पाटणा, नाशिक आणि इतर शहरात इंधनाच्या दरात वाढ दिसून आली. तर फरीदाबाद, भोपाल, मंगळुरू आणि नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती घसरल्या.