कोल्हापूर: 25 सप्टेंबर रोजी इथेनॉल निर्मिती बाबत वेबिनार आयोजित करण्यात आला होता, त्याचे स्वागत व प्रास्ताविक प्रसंगी विस्मा चे अध्यक्ष श्री . बी.बी. ठोंबरे यांनी केंद्रीय अन्न नागरी पुरवठा सहसचिव(साखर) याना महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या वतीने आश्वासन दिले कि यावर्षी अपेक्षित 105 लाख टन साखरेपैकी किमान 10 लाख टन साखर आम्ही इथेनॉल निर्मिती कडे वळवू , त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी करण्यास मदत होईल.
ऊस एफआरपी, साखरेची किंमत, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑईलची असणारी किंमत या सार्याचा विचार करुन इथेनॉलला चांगला दर देण्याबाबत सरकारचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेबिनार मध्ये विस्मा शी बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वी विस्मा ने मंत्री गडकरी यांची भेट घेवून त्यांच्या समोर हे मुद्दे मांडले होते.
याबाबत बोलताना विस्मा चे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे म्हणाले की, यंदा साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढेल. ज्यादा साखर निर्मितीमुळे कारखाने अडचणीत येवू शकतात. पर्यायाने कारखानदारही अडचणीत येवू शकतात. या सार्याचा विचार करता अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करणे हा चांगला पर्याय आहे. साखरेचा वापर इथेनॉल, इतर केमिकल्स, बायो सिएनजी साठी केल्यास साखर उद्योग स्वावलंबी होईल.
त्यानुसार सकारात्मक पावले विस्मा ने उचलली आहेत. राज्यात 108 कारखान्यांकडे डिस्टलरी आहेत. त्यांच्याकडून 25 टक्के ऊसाचा रस शुगर सिरपच्या माध्यमातून डिस्टरलीकडे थेट पाठवून इथेनॉल निर्मिती करणे शक्य आहे.ज्या कारखान्याकडे डिस्टलरी नाही ते मोलॅसिस विकू शकतात , शिवाय बी हेवी व शुगर सिरप इथेनॉल निर्मिती साठी वापरुन तब्बल 20 लाख टन साखर उत्पादन कमी करता येईल. अर्थात 15 टक्के साखर उत्पादन कमी होवू शकते. असे विस्माचे म्हणणे आहे.
गोदावरी साखर रिफायनरी आणि सोमय्या ग्रुपने 35 टक्के शुगर सिरप वापरुन इथेनॉल निर्मिती केली आहे. हा प्रयोग राज्यातील सर्व कारखान्यांना शक्य आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.