‘विस्मा’ व भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ विषयावरील परिसंवादाचे आयोजन

पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेनुसार व जैव इंधन २०१८ च्या धोरणानुसार साखर उद्योगामध्ये प्रेसमड व स्पेंटवॉशपासून ‘बायो सीएनजी’ निर्मिती प्रकल्प “सतत” या योजनेद्वारे भारत पेट्रोलियम कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे. यानुसार वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) व भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने २६/०३/२०२५ रोजी रॉयल कनॉट बोट क्लब (पुणे) येथे ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ (सीबीजी) या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये राज्यातील साखर कारखान्यांचे २५ अधिकारी व इतर सलग्न उद्योगातील २५ मान्यवर अशा एकूण ५० प्रतिनिधीनी परिषदेमध्ये उपस्थिती लावली होती.

यावेळी ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले म्हणाले कि, राज्यात सीबीजीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यास खुप वाव आहे. त्यांनी सर्व साखर कारखान्यांना प्रेसमड/स्पेंटवॉशपासून सीबीजी उत्पादन घेण्याचे आवाहन केले. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. सोबत संलग्न करार अथवा भागिदारी करून नैसर्गिक व प्रदुषणविरहीत इंधनाचे उत्पादन करून भारत आत्मनिर्भर होण्यामध्ये मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. च्या अधिकाऱ्यांनी सीबीजी उद्योगाचे महत्व समजावून सांगितले. सीबीजी हे आधुनिक काळाचे अत्यावश्यक व आर्थिक फायदा मिळवून देणारे इंधन असल्याचे त्यांनी नमूद केले. कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेल्या गॅसच्या विक्रीबाबत ऑईल कंपन्यांकडून १०० टक्के काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे सीबीजी उत्पादनाकरीता भारत सरकारच्या Sustainable Alternative Towards Affordable Transportation (SATAT) योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सवलत व अनुदान देण्यात येते. त्यामुळे सीबीजीच्या उत्पादनामध्ये राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

परिसंवादास भारत पेट्रोलियम (मुंबई) चे महाव्यवस्थापक ससीप्रकाश, उपमहाव्यवस्थापक संजय ठाकूर, जीपीएस रिन्युएबलचे मिलिंद पत्के, बीपीसीएलचे संतोष निवतकर, सुरेश व रोहित यांनी तांत्रिक व आर्थिक सादरीकरणे केली. ‘विस्मा’चे दिपक कांबळे यांनी परिसंवादाचे समन्वय केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here