बागपत : जिल्ह्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम उशीरापर्यंत सुरू राहणार आहे. एप्रिल महिना सुरू झाला तरी अद्याप शेतांमध्ये ५८ लाख क्विंटल ऊस कापणीविना आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय, गव्हाचे पिक पक्व होऊन तयार आहे. त्यामुळे तोडणीवर परिणाम होईल.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी आतापर्यंत २१६ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत शेतांमध्ये ५८ लाख क्विंटल ऊस शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील ऊस तोडणीची समस्या सतावत आहे. उन्हामुळे हंगाम सुरू झाला आहे. गव्हाचे पिक तयार झाले आहे. अशात ऊस तोडणी व गव्हाची कापणे एकदम करणे कठीण आहे असे सरुरपूर कला येथील सतेंद्र यांनी सांगितले.
बागपत जिल्ह्यात रमाला आणि बागपत साखर कारखान्यांनी आतापर्यंत २१२ कोटी रुपयांहून अधिक ऊस बिले दिली आहेत. बागपत कारखान्याने ८२ कोटी ३५ लाख रुपये आणि रमाला कारखान्याने १३० कोटी रुपयांची बिले दिली आहेत. मलकपूर कारखान्याकडे गेल्या हंगामातील ७७ कोटी रुपये थकीत आहेत. तर नव्या हंगामातील ३६५ कोटी ७८ लाख रुपये थकीत आहेत. कारखान्याकडे दोन्ही हंगामातील मिळून ४४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यंदा उशीरा कारखाने बंद केले जातील असे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी सांगितले.