सांपला (रोहतक) : काळाबरोबरच आता शेतकर्यांच्या शेतीतही बदल होत आहे. नव्या तंत्रज्ञानाने त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपारिक शेतीऐवजी आता आधुनिक शेतीकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. हा बदल हरियाणातून सुरु झाला आहे. याबाबत त्यांनी इजराइल मधून तांत्रिक माहिती घेवून मशीन विकत घेण्यास सुरुवात केली आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे त्यांना चांगला फायदा होईल. हे तंत्रज्ञान वापरुन त्यांनी ऊसाबरोबरच जिर्याची शेती सुरु केली आहे. राज्यातील आठ हजार शेतकर्यांनी पेरणीसाठी इजराइल मधून मल्टी सीडर मशीन खरेदी केली आहे. या मशीनची भारतातील किंमत दीड लाख रुपये आहे. हे मशीन खरेदी करण्यासाठी भारतीय जैविक किसान सेवा केंद्राचे सहकार्य मिळत आहे.
आधुनिक पद्धतीने जैविक शेती करणार्या शेतकर्यांना एमओयू वर सही करावी लागते. या एमओयू अंतर्गत शेतकर्यांना आपले पीक बाजारापर्यंत घेवून जाण्याची गरज पडत नाही. एमओयू नुसार, शेतकर्यांच्या थेट शेतातील पीक घेतले जाते. एमओयू च्या नुसार, जीर्याची किंमत 280 प्रति किलो आहे, तर ऊसाचा दर 550 रुपये प्रति क्विंटल आहे. शेतकर्यांच्या सोयीसाठी राज्यातील अनेक परिसरात सेवा केंद्रांची स्थापना केली आहे. डॉ. दिलबाग गुलिया यांच्या मतानुसार, गेल्या वर्षी राज्यात जवळपास 2 हजार शेतकर्यांनी जीरे आणि ऊस अशी मल्टीक्रॉप्स ची शेती केली होती, पण आता जवळपास 8 हजार शेतकर्यांनी इजराइल च्या पद्धतीप्रमाणे ऊस आणि जीर्याची पेरणी केली आहे.
यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.