गेल्या तीन दशकांपासून रमाला साखर कारखान्याच्या पुर्नविकासाची मागणी होत होती. त्यामध्ये पूर्वीच्या सरकारांनी काही केले नाही. आमच्या सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या कर्मभुमीत रमाला साखर कारखाना पुन्हा सुरू केल्याने जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे असे ट्वीट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी ट्विट करून आपल्या सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.
याबाबत टीव्ही९हिंदी डॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, येथील जनतेच्या पाठबळाने आत्मनिर्भर उत्तर प्रदेशसाठी ऊर्जा मिळत आहे. आणखी एका ट्विटमध्ये मुख्यमंत्री योगी म्हणाले, माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह आणि महान शेतकरी नेते दिवंगत चौधरी महेंद्र सिंह टिकैत यांच्या नावावर जिल्ह्यात बागपतमधील दोन रस्त्यांचे नामकरण करण्याचा निर्णय भाजप सरकारने केले आहे. सरकारने त्यांच्या प्रती आदरांजली आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की आंतरराष्ट्रीय शूटर दिवंगत चंद्रो तोमर यांच्या नावे शूटर दादी असे शुटिंग रेंज तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. डबल इंजिनचे सरकार ईस्टर्न फेरिपेरल एक्स्प्रेस वे बागपतवासियांच्या सेवेसाठी कार्यरत आहे.