महिला दिन विशेष : छत्रपती संभाजीनगरच्या शिंदे भगिनींनी गुळ उद्योगात नाविन्यपूर्ण संकल्पनेने मिळवले यश

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या प्रीती शिंदे आणि सायली शिंदे यांचे कुटुंब चार दशकांपासून गूळनिर्मिती करतात. या कुटुंबातील प्रीती व सायली या चुलत बहिणींनी घरच्याच गुऱ्हाळात तयार होणारा गूळ पाहून गुळाचे क्युब्स तयार करण्याची संकल्पना मांडली. या नावीन्यपूर्ण प्रयोगातून प्रीती आणि सायली शिंदे या भगिनींनी मोठी झेप घेतली आहे. नवीन बाजारपेठ कशी तयार करायची याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. ढेप आणून गुळ चिकट होणे, वापरात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी घरी वापरता येण्याजोग्या आकाराचे गुळाचे क्युब्स आणले तर त्याला ग्राहक निश्चित मिळतील अशा विचारातून त्यांनी गुडवर्ल्ट हे स्टार्टअप २०२१ मध्ये सुरू केले आहे.

प्रीती आणि सायली यांनी वाळूजच्या औद्योगिक वसाहतीत कारखाना उभा केला आहे. गुळाचे ५ आणि १० ग्रामचे क्युब्स तयार करण्यासाठी विशिष्ट यंत्रसामग्री हवी होती. ती तयार करून घेतली. २०१९ मध्ये त्यांना ५ ग्रॅमचे क्युब्स तयार करण्यात यश आले. २०२० मध्ये दुबईतील एका प्रदर्शनात त्यांनी आपल्या गुळाचे क्युब्स ठेवले. त्या प्रदर्शनाला अनेकांनी गुळाच्या क्युब्सच्या कल्पनेचे कौतुक केले आणि त्यातूनच या गुडवर्ल्ड साकारले. आतापर्यंत२ कोटी क्युब्जची विक्री झाली आहे. त्यांनी आधी फक्त गुळाचे दोन प्रकारचे क्युब्स आणि पावडर उत्पादन सुरू केले. नंतर त्यात विविध फ्लेवर्स आणत गुळाचा गोडवा वाढवला. आकर्षक पॅकिंग आणि ब्रॅण्डिंग करीत ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. आज गुडवर्ल्डकडे १२ फ्लेवर्सचा गूळ आहे. हा गुळ देशात आणि परदेशातही वापरला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here