पाटणा : बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील नवानगर मध्ये भारत प्लस इथेनॉल (Bharat Plus Ethanol) च्यावतीने १०० KLPD क्षमतेच्या धान्यावर आधारित डिस्टिलरी युनिटची स्थापना करण्यात येत आहे. या युनिटमधून ३.२ मेगावॅट सहवीज उत्पादन युनिटचाही समावेश असेल. त्याची उभारणीही केली जाईल.
याबाबत प्रोजेक्ट्स टुडे मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्रालयाने (MoEF) या योजनेला पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता डिस्टलरी युनिटचे काम गतीने सुरू आहे. आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत युनिट तयार होईल अशी अपेक्षा आहे.