पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचा मोलाचा वाटा आहे, असे मत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले. कारखान्यातील २३ कामगारांचा निवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अध्यक्ष जगताप बोलत होते. उपाध्यक्ष बाळासाहेब कामठे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक शिवाजीराजे निंबाळकर, सुनील भगत, संग्राम सोरटे, लक्ष्मण गोफणे, तुषार माहूरकर, अनंत तांबे, आनंदकुमार होळकर, ऋग्री गायकवाड, प्रणिता खोमणे, प्रवीण कांबळे, विश्वास जगताप, हरिभाऊ भोंडवे, किसन तांबे, कमल पवार, सचिव कालिदास निकम, शेतकी अधिकारी सतीश काकडे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सेवपूर्तीनिमित्त संचालक मंडळाच्या हस्ते रमेश शिंदे, सतीश जगताप, हनुमंत गडदरे, दत्ता माळशिकारे, नंदकुमार भोसले, लहुसिंग गायकवाड, ज्ञानदेव गाढवे, पोपट दिवेकर, शिवाजी वायाळ, संजय फरांदे, प्रल्हाद नेवसे, बाळासाहेब कदम, प्रकाश सावंत, विजय काकडे, बाळासाहेब वायसे, मोहन लावंड, गोकूळ ठोकळे, नारायण धुमाळ, धनंजय भगत, शिवदत्त नवले, राजेंद्र होळकर, हेमंत ढोले, सूर्यकांत शिंदे या कामगारांचा सत्कार करण्यात आला. कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांनी आभार मानले.