ऊस वजन करण्यास कामगारांचा नकार, शेतकऱ्यांचा साखर कारखान्यात गोंधळ

हरगाव : अवध साखर कारखान्याच्या यार्डमध्ये पाल्यासह ऊस आणल्याचा आक्षेप घेत कामगारांनी त्याचे वजन करण्यास नकार दिल्याने आणि शिवीगाळ केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कारखान्याच्या गेटसमोर गोंधळ घालत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सुमारे दीड तास कामकाज विस्कळीत झाले. यानंतर ऊस विभागाच्या महाव्यवस्थापकांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना शांत केले.

अमर उजालामधील वृत्तानुसार, शहरातील बिर्ला ग्रुपच्या अवध साखर कारखान्यात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. कारखान्याच्या गेटसमोर शेकडो शेतकरी जमले. त्यानंतर ऊस वजन करण्याचे काम बंद पाडण्यात आले. तोलाई कामगारांनी उसामध्ये पाला असल्याचे कारण देत तो वजन करण्यास नकार दिला. मात्र, असाच ऊस जेव्हा दलाल घेवून येतात, त्यावेळी त्याचे वजन करण्यात येते असा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी कामगारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला. ऊस घेवून आलेल्या काही शेतकऱ्यांना कामगारांनी पळवून लावले. त्यामुळे शेतकरी संतप्त बनले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. घटनास्थळी आलेल्या शेतकरी नेते पिंदर सिंह सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर महाव्यवस्थापक शरद सिंह यांनी शेतकऱ्यांशी चर्चाकरून तोडगा काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here