सोलापूर : अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्यामध्ये सन २०२३ – २४ मध्ये उत्पादित झालेल्या ५ लाख ७ व्या साखर पोत्याचे पूजन पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अल्पावधीतच राज्यात नावारूपाला आलेल्या लोकनेते कारखान्याच्या ५ लाख ७ व्या साखर पोत्याचे माझ्या हस्ते पूजन हा अविस्मरणीय क्षण आहे असे मनोगत सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलिस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांनी व्यक्त केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक ऊर्जितावस्था आणण्यामध्ये साखर कारखानदारीचा उल्लेखनीय वाटा आहे असे ते म्हणाले.
उप अधीक्षक देवळेकर यांनी कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्याकडून कारखान्याच्या वाटचाली संदर्भातली माहिती जाणून घेतली. कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, संचालक प्रकाश चवरे, संचालक मदन पाटील, संभाजी चव्हाण, शुक्राचार्य हावळे, अशोक चव्हाण, धनाजी गावडे, भारत सुतकर आदी उपस्थित होते. पोलिस प्रशासनाबद्दलची सामान्यांमधील विश्वासार्हता वाढवण्यावर विशेष लक्ष देणार आहे, असेही देवळेकर यांनी यावेळी सांगितले.