सोलापूर : आलेगाव बुद्रुक येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडच्या आलेगाव युनिट क्रमांक चारच्या गळीत हंगामासाठी लागणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा, मशिनरी ओव्हर ऑईलिंगसह दुरुस्तीची कामे जलद गतीने सुरू आहे. आरोग्य मंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजी सावंत यांनी व्यक्त केला. युनिटच्या हंगाम २०२४-२५ साठीच्या मिल रोलरचे पूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सावंत बोलत होते.
यावेळी भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, जनरल मॅनेजर सुरेश पाटील, वडोलीचे सरपंच तानाजी गाडे, अजिंक्य काटे, प्रोसेस जनरल मॅनेजर पोपट क्षीरसागर, चिफ अकाउंटंट विठ्ठल काळे, सुरक्षा अधिकारी रावसाहेब आजबे, स्टोअर कीपर सुधीर पाटील, मॅनेजर प्रवीण बर्गे, सिव्हिल विभाग प्रमुख राहुल खटके, हेड टाईम किपर सुमित साळुंखे यांच्यासह सभासद, शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार व कर्मचारी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.