सोलापूर: सध्याच्या वातावरणाने चालू वर्षी आणि पुढील वर्षी ऊस उत्पादनावर परिणाम होईल अशी शक्यता आहे. मात्र, आपल्या कारखान्याचे कामगार, अधिकारी, व्यवस्थापन मंडळ अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी केले. दिसासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगरच्या गळीत हंगाम २०२४- २५ च्या मिलरोलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गिरमे यांनी सांगितले की, मागील वर्षाचा खोडव्याला पोषक वातावरण न मिळाल्याने यावर्षी खोडवा कमी प्रमाणात आहे. एकंदरीतच ऊस उत्पादनावर परिणाम होत असून पुढील वर्ष आर्थिक अडचणीचे असू शकते. दरम्यान, कारखान्याचे संचालक परेश राऊत यांनी सांगितले की, येत्या हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज आहे. येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करत सासवड माळीचा हंगाम सुरू करण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. यावेळी सोसायटी चेअरमन अमोल ताम्हाणे यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक सतीश गिरमे, पूर्णवेळ संचालक परेश राऊत, माजी व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार गिरमे, संचालक नीळकंठ भोंगळे, निखिल कुदळे, नितीन इनामके आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.