कृष्णा कारखान्यात मिल रोलरचे पूजन

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आगामी गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते झाले. यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्यास प्रारंभ झाला. उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलरची पूजा करण्यात आली. यावेळी साखर कारखान्याचे संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, शिवाजी पाटील, दीपक पाटील, संभाजीराव पाटील, निवासराव थोरात, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक राम पाटील आदी उपस्थित होते. यावेळी १० वि आणि १२ वि परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या कारखाना कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here