सोलापूर : येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ मधील गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या एक लाख एकाव्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतिपथावर असल्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले.
कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर रोजी सुरू झाला आहे. १७ नोव्हेंबर अखेर एक लाख ३७ हजार ३४७ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन एक लाख नऊ हजार २५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ८.४८ टक्के आहे. सध्या प्रति दिन आठ हजार ५०० मेट्रिक टनप्रमाणे उसाचे गाळप होत आहे. चालू सिझन मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्पात वीज एक कोटी पाच लाख ७० हजार ६०० युनिट निर्माण झाली आहे. त्यामधून वीज विक्री ६२ लाख सात हजार ५३० युनिट केली आहे. डिस्टिलरीमध्ये बी-हेवीपासून २१ लाख ५३ हजार ८०८ लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट, तर १६ लाख ५३ हजार ४८६ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असलेची माहितीही राजेंद्र चौगुले यांनी दिली.
या कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील, संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भीमराव काळे, अमरदीप काळकुटे, रामचंद्र ठवरे, तज्ज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे, शिवसृष्टी किल्ला संचालक पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, हर्षाली निंबाळकर उपस्थित होते.