लातूर : बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते बुधवारी (दि. १७) आषाढी एकादशीदिनी येत्या हंगामासाठी मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी माजीमंत्री देशमुख यांनी येणाऱ्या हंगामातील पूर्व कामकाजाचा आढावा घेतला. कार्यक्षेत्रातील ऊस उपलब्ध आढावा घेऊन कामाबाबत समाधान व्यक्त केले. हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव काकडे, कारखान्याचे अध्यक्ष श्याम भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, यशवंत पाटील, अनंत देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संभाजी सूळ, सचिन दाताळ, गणपत बाजुगळे, अॅड. बाबासाहेब गायकवाड, श्यामराव साळुंके, अमित माने, विलास काळे, सुभाष जाधव, संतोष भोसले, अनिल पाटील, गोविंद सोनटक्के, रमेश वळके. शिवाजी बिराजदार, चंद्रसेन पाटील, भरत माळी, कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे उपस्थित होते.