लातूर : अहमदपुर तालुक्यातील उजना येथील सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज येथील साखर कारखान्याचा २०२३-२४ हंगामात उत्पादीत झालेल्या पहिल्या पाच साखर पोत्याचे पूजन उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक माजीमंत्री बाळासाहेब जाधव होते.
यावेळी कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर एस. आर. पिसाळ, जनरल मॅनेजर (टेक) बी. के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन) पी. एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) एस.बी. शिंदे, चिफ फायनांस ऑफिसर डॉ. आनंद पाटील, चिफ अकाउटंट एल. आर. पाटील, ऊस विकास अधिकारी वाय. आर. टाळे, टेक्नीकल सल्लागार सोमवंशी, डिस्टीलरी मॅनेजर सागर जाधव, ई.डी.पी. मॅनेजर प्रशांत जाधव, डे. चिफ इंजिनिअर मुलानी, सिनिअर केमीस्ट सोमवंशी, परचेस ऑफिसर धनराज चव्हाण, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर लोखंडे, गोडाऊन किपर अरविंद कदम, पर्यावरण अधिकारी डी. जी. ताटे, डोंगरे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.