बिजनौर : जर शेतकर्यांचा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर आगामी गाळप हंगामात शेतकर्यांना मोठी अडचण निर्माण होवू शकेल. अधिकांश माहिती मॅसेजच्या माध्यमातून मोबाईल वर येईल. मोबाईल नंबर चुकीचा असेल तर अडचण येवू शकते. यावेळी शेतकर्यांना ऊस विकण्यासाठी समित्यांकडून ऊस पावती मिळणार नाही.
मॅसेज शेतकर्यांच्या मोबाईल वर येतील. विभागाशी संबंधित माहितीचे मॅसेज ही शेतकर्यांच्या मोबाईवर मिळतील ऊस विभाग शेतकर्यांना अपील करत आहे की, सर्वे प्रदर्शना दरम्यान आपला मोबाईल नंबर तपासून घ्या. जर मोबाईल नंबर चुकीचा असेल तर तो योग्य करुन घ्या. शेतकरी आपला मोबाईल नंबर सर्वेच्या दरम्यान दुरुस्त करत आहेत. शेतकर्यांचे जे जुने नंबर चालत नाहीत, त्या शेतकर्यांनी नवा नंबर विभागाला द्यावा, जेणेकरुन त्यांना अडचणी येवू नयेत. अपर सांख्यिकी अधिकारी ऊस विकल भारती यांनी सांगितले की, मोबाईलवरच मैसेज येतील. जर मोबाईल नंबर चुकीचा असेल तर शेतकर्यांनी तो दुरुस्त करुन घ्यावा. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, शेतकर्यांचा नंबर योग्य असला पहिजे. आता संशोधन होवू शकेल, पण त्यानंतर नाही. सर्वे प्रदर्शन दरम्यान जिल्ह्यातील शेतकर्यांनी आपला नंबर दुरुस्त करुन घ्यावा.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.