यमुनानगर : राज्य सरकारने ऊसाला वाढीव किंमत द्यावी, या मागणीसाठी भारतीय किसान संघ आणि भारतीय किसान युनियनच्या नेत्रुत्वाखाली शेतकर्यांच्या वतीने यमुनानगर येथील सरस्वती साखर कारखान्याच्या ऊस यार्डजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.
भारतीय किसान संघाचे प्रदेश सचिव रामबीरसिंग चौहान म्हणाले, शेतकरी ऊस दरामध्ये वाढ करण्याची मागणी यापूर्वीपासून करत होते, पण सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे धरणे आंदोलन करावे लागत आहे. याबरोबरच कारखान्याला गाळपासाठी येणारा ऊसही दोन तास रोखण्यात आला होता. सरकारच्या उदासीन धोरणामुळे येत्या 20 जानेवारीला रादौर शहरात हरियाणाच्या ऊस उत्पादकांची महापंचायत घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.