यमुनानगर साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा आठवडाभर लवकर

यमुनानगर : यमुनानगरच्या सरस्वती शुगर मिल्सच्या (एसएसएम) व्यवस्थापनाने १६ नोव्हेंबरपासून आपला गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी कारखान्याने २४ नोव्हंबर रोजी आपले गळीत सुरू केले होते. कारखान्याशी संलग्न ६७२ गावातील शेतकरी या निर्णयामुळे खुश झाले आहेत. त्यांना आता आपल्या २५,००० एकर शेतामध्ये वेळेवर गहू पिक घेणे शक्य होणार आहे. प्रती दिन एक लाख क्विंटल क्षमतेसह हा कारखाना देशातील सर्वात मोठ्या कारखान्यापैकी एक आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे ९०,००० एकर शेती आहे. यामध्ये यमुनानगर, अंबाला आणि कुरुक्षेत्रच्या काही भागाचा समावेश आहे.

कारखान्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष डी. पी. सिंह यांनी सांगितले की, या वर्षी आम्ही गेल्यावर्षीच्या तुलनेत एक आठवडा आधी गाळप सुरू करीत आहोत. ते म्हणाले, ऊस लावण करताना आम्ही शेतकऱ्यांना २०२१-२२ या हंगामात लवकरात लवकर गाळप सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्यावर्षी कारखान्याने १६२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले. ते म्हणाले, यंदा १७५ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्यावर्षी आम्ही ऊस उत्पादकांना ५६५ कोटी रुपये दिले होते. कोणत्याही शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत नाहीत. कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना ऊस गाळपाच्या समस्येतून मुक्त करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here