यमुनानगरात मोलॅसीसवर आधारित इथेनॉल प्लांट सुरू

यमुनानगर : सरस्वती शुगर मिल्सने (एसएसएम) २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोलॅसीसवर आधारित इथेनॉल प्लांट स्थापन केला आहे. हा प्लांट एसएसएमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी मदत करेल. या कारखान्याशी संलग्न २०,५०० ऊस उत्पादन शेतकऱ्यांना वेळेवर बील देण्यासाठी मदत होईल.

द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, याचे उद्घाटन बुधवारी एसएसएमचे कार्यकारी संचालक आदित्य पुरी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे केले. एसएसएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. सचदेवा यांनी पॉवर बटण दाबून प्लांट सुरू केला. सचदेवा यांनी सांगितले की, १०० केएलपीडी प्रती दिन उत्पादन क्षमतेसह प्लांटमध्ये एसएसएमपासून उत्पादित मोलॅसिसचा उपयोग केला जाईल. पेट्रोलियम कंपन्यांना ते इथेनॉल पुरवठा करतील.

ते म्हणाले, हा प्लांट १०० केएलपीडी इथेनॉलचे उत्पादन करेल. कच्च्या तेलावरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण केले जाते. या प्लांटमधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल. यासोबतच एसएसएमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि कारखान्याशी संलग्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले देण्यास मदत होईल. इथेनॉल प्लांटची निर्मिती एसएसएमच्या सहयोगी कंपन्यांपैकी एक आयएसजीईसी, नोएडाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here