पुणे : सध्या उकाड्याने अंगाची लाही लाही होत असली तरी रविवारपासून राज्याच्या काही भागात तीन दिवस पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रविवार, सोमवार आणि मंगळवार आणि नांदेड जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या श्री बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी तर लातूर जिल्ह्यात रविवारी आणि मंगळवारी आणि धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी ढगांच्या गडगडाटास काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी ढगांच्या गडगडाटास काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोमवारी आणि मंगळवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.