मध्य प्रदेशात उत्तर भारतामधून येणाऱ्या शीत लहरीमुळे तापमानात घसरण सुरू आहे. त्यामुळे थंडीचा परिणाम वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत कडाक्याची थंडी असेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. कारण, हिमालयात बर्फवृष्टीला वेग आला असून त्याचा परिणाम राज्यात दिसून येत आहे. हवामान विभागाने सांगितले की, राज्यात तापमान आणखी गतीने घसरेल. त्यामुळे राजधानी भोपाळसह इंदौर, ग्वाल्हेर, जबलपूरसह सर्व जिल्ह्यात तापमान घसरल्याने थंडी वाढेल. गेल्या २४ तासात नौगावमध्ये सर्वात कमी तापमान २.० डिग्री सेल्सिअसची नोंद झाली आहे. सायंकाळी चार वाजल्यानंतर गतीने तापमान घसरले. त्यामुळे थंडीचा तडाखा जाणवला.
न्यूज २४ ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात आणखी तापमान घसरेल. मध्य प्रदेशातील ४३ जिल्ह्यात किमान तापमान १० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. दतीयामध्ये २.५ डिग्री, ग्वाल्हेरमध्ये २.९ डिग्री तापमान नोंदविण्यात आले आहे. याशिवाय राजधानी भोपालमध्ये ७.६, इंदौरमध्ये ८.६ डिग्री, खजुराहोमध्ये ३.२ डिग्री, राजगढमध्ये ३.५ डिग्री सेल्सिअस तापमान राहिले. दतिया, धार आणि इंदौरसह आसपासच्या जिल्ह्यांत सर्वाधिक थंडी होती असे सांगण्यात आले. आता हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात ग्वाल्हेर, चंबल, संभागसह उमरिया, रतलाम, राजगढ, रीवा, सतना आणि सागर जिल्ह्यात हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.