पाथरी : तालुक्यातील योगेश्वरी शुगर्स या खाजगी तत्वावरील साखर कारखान्याच्या २२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे प्रमोटर लक्ष्मीकांतराव घोडे, सुदामराव सपाटे, इंदरराव कदम, गंगाधरराव गायकवाड यांच्या हस्ते झाला. यज्ञेश्र्वर रंगनाथ महाराज सेलुकर, अतुल महाराज खांडवीकर, अभिजित गुरू जोशी सोनपेठकर यांनी पौरोहित्य केले. गळीत हंगाम प्रारंभ हभप अच्युत महाराज शिंदे कान्सुरकर यांच्या हस्ते गव्हाणी पूजन करून मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार आर. टी देशमुख, एम. टी. देशमुख, जे. टी. देशमुख, संचालक डॉ. अभिजित देशमुख, सचिन देशमुख, कार्यकारी संचालक रोहित देशमुख, बबनराव सोळंके, विनोद देशमुख, जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे, सरपंच विष्णु चव्हाण, लक्ष्मणराव दुगाने, सरपंच सुनिल चव्हाण, व्यंकट गित्ते, श्रीपाद कोंत, महादेव सोनवने, परमेश्वर तिडके, किरण घुंबरे, पिंटू घुंबरे, सिद्धेश्र्वर गिरी, नारायण राठोड, अली भाई, मंकाजी शिंदे, दत्तराव धर्मे, ज्ञानोबा हरगुडे, मोहनराव देशमुख, कल्याणराव देशमुख, माजी सरपंच सुग्रीव तिडके, संतोष रणेर, हरी भरवाड, कन्हैय्या भारवाड, कारखाण्याचे अधिकारी साखरे, नवनाथ चौधरी आदी उपस्थित होते.