गाझियाबाद : चीनी मंडी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी दिली नाही तर, जेलची हवा खावी लागले, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याती थकबाकीदार साखर कारखान्यांना इशारा दिला आहे.
राष्ट्रीय किसान दिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याचे शोषण खपवून घेतले जाणार नाही.’ कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी गुडांनाही ठणकावले. त्यांनी गुन्हेगारी कामे थांबवावीत अन्यथा त्यांना त्यांची जागा (कारागृह) दाखवून देऊ, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त पटला गावामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यातील नोकरशहांनी भ्रष्टाचारा अडकू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या हस्ते २५ विकासकामांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन झाले. एकूण ३२५ कोटी रुपयांची ही विकासकामे आहेत.