लखनऊ : देशभरातून उत्तर प्रदेशात परत आलेल्या श्रमिकांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकार्यांना औद्योगिक प्लांटचे काम सुरु करण्याचे आदेंश दिले आहेत. राज्यामध्ये 119 साखर कारखाने पहिल्यापासूनच सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 12,000 विट भट्ट्या अणि 2500 शीतगृहांचेही काम सुरु झाले पाहिजे. त्यांनी सांगितले की, प्रत्येक वीट भट्टी 200 श्रमिकांना आणि एक कोल्ड स्टोअरेज 150 श्रमिकांना रोजगार देईल.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मोठ्या उद्योगात 2.12 लाख पेक्षा अधिक श्रमिकांना रोजगार मिळावेत. उत्तर प्रदेश प्रवासी श्रमिकांसाठी एक सुरक्षित स्थळ बनला आहे. लॉकडाउननंतर राज्यात 10 लाखापेक्षा अधिक प्रवासी आपल्या घरी परत आले आहेत. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार त्यांचे भोजन, चिकित्सा आवश्यकता, सुरक्षा आणि रोजगार याबाबत त्यांना दिलासा देत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.