शामली : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने तातडीने उसाचा दर जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश मुख्य संघटक डॉ. प्रमोद कुमार पांडेय यांनी केली आहे. हरड फतेहपूर गावात डॉ. पांडेय यांनी कृषी कायद्यातील त्रुटींचा पाढा वाचत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
हरड फत्तेहपूर गावात काँग्रेस सेवादलाचे माजी प्रमुख नेत्रपाल सिंह ठाकूर यांच्या घरी आयोजित बैठकीत प्रदेश मुख्य संघटक डॉ. प्रमोद कुमार पांडेय यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी कायद्यांविषयी चर्चा केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, सरकारने अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे योगी सरकारने तातडीने ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली.
डॉ. पांडेय हे हरड फत्तेहपूर येथील कार्यक्रमापूर्वी पूर्व शामलीमधील ऐतिहासिक सुभाष चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमातही सहभागी झाले. यावेळी मुझफ्फरनगर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाल वर्मा, शामलीचे माजी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, अनिल देव त्यागी, राकेश शर्मा, वैभव गर्ग, राजेश कश्यप, पुरुषोत्तम सिंह, अनुज गौतम, कांग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक सैनी, श्याम लाल शर्मा आदी उपस्थित होते. ओमवीर उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले.