अलीगढ : उत्तर प्रदेशच्या रेशन दुकानावर आता गहू आणि तांदळा बराबेरच साखर उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्यात, योगी सरकार ने प्रत्येक अंत्योदय कार्डधारकाला अनुदानाच्या दराने महिन्याला एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीगढ डिवीजनमध्ये जवळपास 96,204 अंत्योदय कार्डधारांना या योजनेचा लाभ होईल. ज्यामध्ये अलीगढ जिल्ह्यातील 24,596 कार्डधारक, एटा मधून 27,164, कासंगज मधून 27,593 आणि हाथरस मधून 16,851 सामिल आहेत.
साखरेचे वितरण ऑक्टोबर मध्ये सुरु होईल. योगी सरकारच्या आदेशावर अन्न व पुरवठा विभागाच्या आयुक्ताकडून एक पत्र जारी करुन सर्व अंत्योदय कार्डधारकांना प्रति महिना एक किलो साखर वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.