राज्यातील साखर उद्योगात ‘जकराया’ची झेप कौतुकास्पद : माजी मंत्री राजेश टोपेंची कारखान्याला सदिच्छा भेट

सोलापूर : कारखानदारीची कोणतीही पार्श्वभूमी वा अनुभव नसताना साखर उत्पादनाबरोबरच अन्य विविध उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प यशस्वीपणे राबवून जकराया कारखान्याने साखर उद्योगात निर्माण केलेली ओळख कौतुकास्पद आहे. अल्प काळात खासगी कारखान्याने घेतलेली ही झेप राज्यातील एक उत्तम उदाहरण असल्याचे मत राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वटवटे (ता. मोहोळ) येथे व्यक्त केले.

माजी आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्यातील अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेश टोपे यांनी वटवटे येथील जकराया साखर कारखान्याला भेट देऊन विविध उपपदार्थ निर्मितीच्या प्रकल्पांची पाहणी केली. त्यांचे जकराया शुगरचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव यांनी स्वागत केले. यावेळी जकराया शुगरचे पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, अनिल पिसे उपस्थित होते. माजी मंत्री टोपे म्हणाले, मोठ्या आर्थिक व मनुष्यबळाची आवश्यकता असणारा हा उद्योग जकराया समूहाने खूपच चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील अॅड. जाधव यांनी त्यांच्या सचिन जाधव व राहुल जाधव या पुत्रांना सोबत घेऊन जकराया उद्योगाची केलेली यशस्वी वाटचाल व राबविलेले आसवनी, सीबीजी गॅस प्रकल्प राज्यासह देशात नावारूपाला आणले, ही अभिमानाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here