हरारे : साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने झिम्बाब्वेतील सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. गेल्या काही दिवसात साखरेच्या दरात प्रति 2 किलो 4 यूएस डॉलरने वाढ झाल्याने लोकांचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर सामान्य लोकांना विनासाखर चहा पिण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे बोलले जात आहे.
एका किरकोळ व्यापाऱ्याने सांगितले की, घाऊक विक्रेते गेल्या आठवडाभरापासून साखरेच्या दरात दररोज वाढ करत आहेत. गेल्या आठवड्यात मी सोमवारी 29 यूएस डॉलर्सची 10X 2 किलो साखर ऑर्डर केली. मी शनिवारी दुसऱ्या ऑर्डरसाठी गेलो तेव्हा मला आढळले की तीच वस्तू 33 यूएस डॉलर्समध्ये विकली जात आहे. ते म्हणाले, यामध्ये वाहतूक खर्च जोडला तर आम्ही जास्त नफा कमावूच शकत नाही, असा दावा त्यांनी केला.काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, त्यांना अलीकडच्या आठवड्यात साखरेचा तुटवडा जाणवत आहे
झिम्बाब्वेमध्ये सध्या दोन साखर कारखाने आहेत.त्यांची एकत्रित वार्षिक साखर उत्पादन क्षमता सुमारे 640,000 दशलक्ष टन आहे. काहींनी साखर खरेदीदारांनी सरकारला ताबडतोब मोफत साखर आयात करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अर्थमंत्री मथुली एनक्यूबे यांनी एक निवेदन जारी करून व्यापाऱ्यांना नफेखोरीपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. तथापि, आजपर्यंत किमती कमी झालेल्या नाहीत.