ओंकार-चांदापुरी युनिटची गाळप क्षमता वाढवणार : संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील

सोलापूर : ओंकार साखर परिवाराचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील हंगामात कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ केली जाणार आहे. कारखान्यात सर्व उपपदार्थ निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत होणार आहेत. गाळपासाठीचे नियोजन आतापासूनच करण्यात येणार अशी घोषणा ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांत बोत्रे-पाटील यांनी केली. ओंकार साखर कारखान्याच्या चांदापुरी युनिट एकच्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते.

बोत्रे- पाटील म्हणाले की, कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस तोडणी कामगार, ऊस वाहतूकदार चालक मालक व ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांची मोलाची साथ मिळाली. ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, ठेकेदार यांना कारखान्याच्या वतीने जे देणे शक्य आहे, ते देण्याचा प्रयत्न करू. यावेळी जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, केन मॅनेजर शरद देवकर, चीफ इंजिनिअर तानाजी देवकते, पी. डी. पाटील, मोहन घोडके, रमेश आवताडे, गणेश धायगुडे, ऊस उत्पादक शेतकरी रामचंद्र मगर, सर्जेराव पिंगळे, राहुल मगर, नितीन जाधव आदी उपस्थित होते. विष्णू गोरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here