मुंबई : साखर उद्योगातील नामवंत कंपनी बजाज हिंदुस्तानचे संचालक माधव लक्ष्मण आपटे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संदर्भात कंपनीने म्हटले आहे की, माधव लक्ष्मण आपटे यांच्याकडून राजीनाम्याचे पत्र मिळाले आहे. त्यांनी १४ ऑगस्ट रोजी राजीनामा दिला आहे.
कंपनीने मुंबई शेअर बाजारातही माहिती दिली आहे. आपटे यांनी वय आणि प्रकृतीचा विचार करून राजीनामा दिल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या बजार हिंदुस्तान शुगर कंपनी उत्तर प्रदेशात १४ साखर कारखाने चालवते. रोज १ लाख ३६ हजार टन ऊस गाळप करण्याची कंपनीची क्षमता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.